संस्कृत प्रवेशिका
शिकवण्याचा प्रकार: ध्वनिमुद्रित ऑनलाईन वर्ग (आठवड्यातून दोनदा), शंकानिरसनासाठी प्रत्यक्ष ऑनलाईन वर्ग (आठवड्यातून एकदा)
शिक्षक: श्री सूर्यनारायण
कालावधी: ५ महिने
एकूण तास: ७५; क्रेडिट: ५
शुल्क: रु ६,०००
पात्रता: देवनागरी लिपीचे ज्ञान
शिकवण्याची भाषा: संस्कृत (भारतीय भाषांच्या मदतीने)
शास्त्र प्रवेशिका
शिकवण्याचा प्रकार: प्रत्यक्ष ऑनलाईन वर्ग (आठवड्यातून दोनदा)
शिक्षक: श्री सूर्यनारायण
कालावधी: ४ महिने
एकूण तास: ४५; क्रेडिट: ३
शुल्क: रु ४,०००
पात्रता: संस्कृत प्रवेशिका किंवा संस्कृत प्राविण्य परीक्षेत ७०% गुण
शिकवण्याची भाषा: संस्कृत
त्वरित नोंदणी सवलत
दोन्ही अभ्यासक्रमांना एकत्र नोंदणी करणाऱ्या पहिल्या १५ विद्यार्थ्यांना ३३% सवलत
शुल्क ऑनलाईन भरा
अभ्यासक्रमाची झलक !!
सवलत: दोन्ही अभ्यासक्रमांना एकदम नाव नोंदणी केल्यास शुल्क रु ९,००० (रु १,००० सवलत)
प्रस्तावना
समाजाच्या विविध स्थरांतून मिळणारा पाठींबा व वाढत्या जागरुकतेमुळे पारंपारिक वेद पाठशाळांतून यशस्वीपणे उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, जी समाधानाची गोष्ट आहे. परंतु अशा संस्थांतील शिक्षक फक्त त्यांच्या क्षेत्रातच पारंगत असतात. सामान्यतः संस्कृत किंवा शास्त्रांमध्ये अधिक संशोधन करण्याची दृष्टी व साधने त्यांच्याकडे नसतात. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी जो फक्त वेदांमध्ये पारंगत आहे, परंतु संस्कृत किंवा शास्त्रांमध्ये नाही, त्याच्याकडे जे शिकलाय त्यातील तांत्रिक बाबी व गाभा समजून घेण्याची क्षमता असेलच असे नाही. अशा परिस्थितीत, वेदिक अभ्यासाला आवश्यक असलेला सम्यक दृष्टीकोन ठेवणारा शिक्षक तो बनू शकणार नाही.
आवश्यकता
वरील आव्हान स्वीकारू शकतील अशा समर्पित शिक्षकांना प्रशिक्षण देणे ही काळाची गरज आहे. विविध वेदिक विधी करणाऱ्या पुरोहितांना मंत्र, श्लोक व संकल्प चांगले माहित असतात, आणि काही प्रमाणात संस्कृत अवगत असते. परंतु एका मर्यादे पलीकडे त्यांचे भाषेच्या तांत्रिक बाबींचे ज्ञान कमी पडते, ज्यामुळे पठण करीत असलेल्या सर्व मंत्रांचा योग्य अर्थ त्यांना माहित असेलच असे नाही. आज नव्याने जगाचे लक्ष आकर्षित करत असलेल्या संस्कृत भाषेचे दालन म्हणूनच त्यांच्यासाठी खुले करण्याची गरज आहे. या ज्ञान खजिन्यातून त्यांच्यासाठी नव्या संधी निर्माण होतील. अशा प्राथमिक प्रशिक्षणातून त्यांना पुढे जाऊन याबद्दलचे अधिक अध्ययन करण्याची इच्छा निर्माण होईल. यातून वेद, धर्म शास्त्र व आगमे यांत दडलेले ज्ञान अवगत करून घेण्याची संधी मिळेल. अशा अभ्यासक्रमाबद्दल विद्यार्थ्यामध्ये उत्सुकता असल्याचे जाणवते.
अभ्यासक्रम कोणासाठी
पौरोहित्य, अर्चक किंवा वेद पारायण अशा प्रकारच्या कामांत देशभरात लाखो लोक कार्यरत आहेत. अशा लोकांना या अभ्यासक्रमाचा लाभ होईल.
अपेक्षित परिणाम
हा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला खालील गोष्टी अवगत होतील.
- संस्कृत भाषेची प्राथमिक रचना (संस्कृत प्रवेशिका)
- पुराण व धर्म शास्त्राची प्राथमिक तांत्रिक रचना (शास्त्र प्रवेशिका)
- मिळवलेल्या ज्ञानाचा रोजच्या व्यावसायिक व्यवहारांत उपयोग (दोन्ही अभ्यासक्रम)
अभ्यासक्रमातील विषय
संस्कृत प्रवेशिका
- एमआयटी एसव्हीएसच्या दोन अभ्यासक्रमांवर आधारित संस्कृतचे प्राथमिक ज्ञान
शास्त्र प्रवेशिका
- सत्यनारायण व्रताच्या पहिल्या धड्यासारख्या व्रत कल्पातून काव्य परिचय
- धर्म शास्त्र – शोधन संस्कारांसंबंधी बाबींचा परिचय
दोन्ही अभ्यासक्रम
- संस्कृतबद्दल अधिक – संकल्प, विधी वाक्य व फलश्रुती यांच्या माध्यमातून विशिष्ठ विभक्ती प्रयोग, समास प्रयोग व धातू प्रयोग यांची अधिक माहिती
- पदविभागासाठी सामान्य व्याकरण
मूल्यमापन आराखडा
- शनिवार-रविवारी प्रश्नमंजुषा / गृहपाठ
- प्रत्येक अभ्यासक्रमासाठी अंतिम परीक्षा
अभ्यासक्रमाची अधिक माहिती
- संस्कृत प्रवेशिका: संस्कृत-१, संस्कृत-२
- शास्त्र प्रवेशिका: पुराण, धर्म शास्त्र व कल्प अशा ग्रंथांचा अभ्यास